सिंधुदुर्गवासीयांसाठी कापडी पिशवी स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी कापडी पिशवी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. टाकाऊ घटकापासून टिकाऊ निर्माण केलेली पिशवी, बहुपयोगी पिशवी आणि आकर्षक पिशवी अशा प्रकारची ही स्पर्धा असून यामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गटातील नागरिक सहभागी होऊ शकतो. यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत इच्छुक स्पर्धकांनी आपला प्रवेश नोंदवायचा आहे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, शिवाजी वाचन मंदिर मालवण, शारदा ग्रंथालय कसाल, स्वावलंबी भारत अभियान सिंधुदुर्ग व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनिष कदम कीर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजेता, उपविजेता, सहविजेता आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक काढून गौरव चिन्ह व रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका एका लखोट्यात अथवा पिशवीत घालून त्यावर आयोजक, कापडी पिशवी स्पर्धा 2024 असे लिहून आपल्या पूर्ण पत्त्यासहित व संपर्क क्रमांक सहित कुडाळ तालुक्यातील पणदूर येथे अभिनव गुरव यांच्याकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन आयोजक यांच्याकडून करण्यात आले आहे. स्पर्धेत एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह सहभागी होऊ शकतो. तसेच एक स्पर्धक एकापेक्षा जास्त गटात किंवा कोणत्याही गटात एकापेक्षा जास्त प्रवेशिका दाखल करू शकतो.

या स्पर्धेसाठी वैभवाडी येथे सी एस सी सेंटर भुईबावडा माहिती सेवा केंद्र रुपेश सुर्वे, दोडामार्ग येथे विठ्ठल आयुर्वेदिक बाजारपेठ विठ्ठल गवस, सिंधुदुर्गनगरी येथे डीआरडीए बिल्डिंग जिल्हा परिषद नजीक निरजा टेक्सटाइल शरद खरात, सावंतवाडी येथे साधले मेस जवळ सुधीर कशाळीकर सबनीसवाडा, माणगाव येथे शांतादुर्गा जेनेरिक प्लस आशिष पाडगावकर, कसाल येथे साप्ते बंधू यांचे भांड्याचे दुकान भूषण साप्ते, वैभववाडी येथे श्री इन्शुरन्स बाजारपेठ प्रशांत कुळये, वेंगुर्ला येथे रघुमदन मेडिकल समोर संजय शिरसाट, मालवण येथे आरोग्य मेडिकल झाटये हॉस्पिटल समोर श्रुती गोलतकर, विजयदुर्ग येथे विजयदुर्ग किल्ल्या नजीक हॉटेल दर्या विवेक माळगावकर, शिरोडा येथे हेअर कटिंग सलून सागर रेडकर या ठिकाणी प्रवेशिका सादर करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!