सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली दरडीत उघडकीस आलेल्या सुशांत खिल्लारे मर्डर गुन्ह्यातील चार आरोपींचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ.सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. सुशांत खिल्लारे मर्डर गुन्ह्यातील आरोपी आबासो उर्फ अभय बाबासो पाटील , प्रवीण विजय बळीवंत (दोघे रा.सांगली ), स्वानंद भारत पाटील ( रा इस्लामपूर , सांगली ), राहुल बाळासाहेब पाटील (रा.वाळवा,सांगली) यांचा जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायालयाने 15 मार्च रोजी फेटाळला.या चारही आरोपींच्या जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी आरोपी आणि या गुन्ह्यातील साक्षीदार हे एकाच परिसरातील असल्याने साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे, आरोपींची ओळख परेड व्हायची आहे आदी मुद्दे उपस्थित केले. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ जोशी यांनी चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.