जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना , मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा-प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी यांचा सत्कार

जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शासनाकडून जेष्ठांसाठी देण्यात आलेल्या विविध योजनांची माहीती

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वामधील अनुच्छेद ३९ क व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे.ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक/मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृद्धापकळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि.०९ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानव्ये निर्गमित करण्यात आले आहे.सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार १ ऑक्टोंबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावेळी शासनाकडून देण्यात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजनांची माहीती देताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि ६५ वर्षांवरील किंवा त्यावरील वयोगटातील जेष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने राज्यात ” मुख्यमंत्री वयोश्री योजना “ राबवीण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेद्वारे नागरीकांना ३००० रु. शासनाकडून दिले जाणार आहेत, त्यामुळे पात्र वृद्धांना सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करता येतील. काही वृद्ध निराधार असतात, त्यांना वृद्धापकाळात आवश्यक असलेले साहीत्य उदा.चष्मा, ट्रायपॉड, कंबरे संबंधीचा पट्टा, फिल्डींग वाॅकर, ग्रीवा काॅलर, स्टिंक व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र इत्यादी वस्तु खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळेच महायुती सरकार ने ही योजना सुरु केल्याची सांगीतले. तसेच तालुक्यातील ६५ वर्षावरील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

तसेच राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वय वर्षे ६० वरील ज्येष्ठ नागरिकांनी ३१ ऑक्टोबर पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी या योजनेची माहीती देताना प्रसंन्ना देसाई म्हणाले की, भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जवळपास देशातील व राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयां मधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून केली आहे.

या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रा पैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थी वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार असावे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष ६० वरील ज्येष्ठ नागरिक असावा.

या योजनेअंतर्गत विविध दळणवळणाच्या साधनांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच आय आर सी टी सी किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित नियमांच्या निविदा प्रक्रियेचे पालन करुन करण्यात येईल. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. तरी, इच्छुक नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले .

यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत असलेल्या योजनांचे मोफत फाॅर्म वाटप करण्यात आले . यावेळी भाजप ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे, अध्यक्ष शामराव काळे सर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, सचिव मोहन दाभोलकर, सहसचिव रामचंद्र घोगळे, सदस्य गुरुनाथ बांदवलकर, संभाजी येरागी, विद्याधर कडुलकर, शांताराम आईर, जगदीश तिरपुडे, सगुण माळकर तसेच अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!