कणकवली तील विद्या मंदिर मराठी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरी केली दिवाळी
कणकवली (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबानी विद्यार्थीना दिवाळी शुभेच्छा म्हणून पारंपरिक उटणे वाटून शुभेच्छा दिल्या.आज विद्या मंदिर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दिविजा वृद्धाश्रमात येउन आजी आजोबा सोबत दिवाळी साजरी केली. जवळ जवळ 50 विद्यार्थी आजी आजोबा साठी दिवाळीचा फराळ व भेट वस्तू घेवुन आले. आपली नातवंडे दिवाळीच्या सणाला भेटायला आली हे पाहून आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाअश्रू आले. नातवंडे आजी आजोबा नी दिवाळीचा धनतेरस दिवस साजरा केला. नातवंडानी आणलेल्या फराळ आजी आजोबाना स्वतः भरवला अशाप्रकारे फराळाचा स्वाद घेतला व जड अंत करणाने आपल्या शालेय नातवंडाचा निरोप घेतला.आपल्या ह्या नातवंडाना आजी आजोबानी भरभरून आशीर्वाद दिले. विद्यार्थी व शिक्षकांनी खरच एक सुंदर उपक्रम केला त्या बदल दिविजा वृद्धाश्रमाने त्याचे मनोभावे आभार मानले.