बावन पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नसतो

भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची पारकर यांच्यावर टीका

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याला जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, बावन पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा राज्याचा जीडीपी कळत नसतो. त्यासाठी विधानसभा लोकसभा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास लागतो हे उबाठा चे उमेदवार संदेश पारकर पारकर यांनी लक्षात ठेवले पाहिजे संदेश पारकर यांनी राणे कुटुंबावरील टीका थांबवावी. राणे साहेब हे आमचे दैवत आहेत त्यांच्यावरील केलेली टीका आम्ही सहन होत नाही. असा इशारा भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली.

माझ्यावर कुटल्या बँकेचे थकीत कर्ज नाही. मला गोव्याला जायची सवय नाही.मला डान्सबार मध्ये जायची सवय नाही. मी फॉर्चूनर सारख्या गाड्या बदलत नाही. राणे साहेबांनी मला काय दिलं याच्यापेक्षा जिल्ह्याला काय दिलं याला मी महत्त्व देतो. राणे साहेब हे व्यक्ती नसुन हे महान विचार आहेत. त्यांच्या विचारांची जीवन ज्योत आम्हाला आशेचा किरण दाखवते. सर्वसाधारण माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो हा विचार प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करणारे दादा खंगलेल्या माणसाला कार्य प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाहीत.

संदेश पारकर यांनी किती सामर्थ्याचा आव आणलात तरी तुमची आणि तुमच्या बरोबर प्रचार करणाऱ्यांची लोकप्रियता मतदाराने ओळखली आहे. आता राणे साहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही मतांची भिक मागा अजुन वेळ गेलेली नाही. मागील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नाईक आणि पारकर कुटुंबाकडून कणकवलीचे स्वयंभु देवस्थानचे प्रमुख यांनी तयार केलेल्या गाव पॅनल ला गोड बोलुन दगा दिला होता. आम्ही स्वाभिमान पक्ष म्हणुन लडलो होतो आणि तुमचा पराभव केला होता आता तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढत आहोत. तेव्हा तुमचा पुन्हा पराभव करणार यात शंका नाही असा विश्वास सुरेश सावंत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!