कट्टा येथील आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

बॅ नाथ पै वाचन मंदिरचे आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै वाचन मंदिर कट्टाच्या वतीने प्रा. मधु दंडवते स्मृतिदिनानिमित्त आयोजित आकाश कंदिल व भेटकार्ड बनवणे स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. यात १९५ स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला. १ ली ते ४ थी गटात ८३, ५ वी ते ७ वी गटात ६५, ८ वी ते १० वी गटात ३५ व खुल्या गटात १२ स्पर्धकानी अशा एकूण १९५ स्पर्धकानी सहभाग घेतला. कागद, कार्डशीट, झावळी याचा वापर करून मुलांनी विविध प्रकारचे कंदील व दिवाळी भेटकार्ड बनविले. या सर्व कंदिलाचे व भेटकार्डचे प्रदर्शन बॅ नाथ पै सेवांगण येथे मांडण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन बाळकृष्ण नांदोसकर, सौ. नांदोसकर, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, मोहन तांबट, दीपक भोगटे, सौ. जांभवडेकर, श्रीधर गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रा. मधु दंडवते स्मृतिदिनी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे. त्याला उपास्थित राहण्याचे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष विकास म्हाडगुत व कार्यवाह दीपक भोगटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!