सिंधुदुर्ग मधून महादेव देसाई राज्य उपाध्यक्ष पदी, विनयश्री पेडणेकर यांची कोषाध्यक्षपदी, प्रशांत पारकर यांची राज्य संयुक्त सचिवपदी तर गुरुदास कुबल व राजाराम कविटकर यांची संघटक पदी निवड
मसुरे (प्रतिनिधी) : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन व शिक्षक नायक स्वर्गीय अरुण भाई दोंदे व सुलभाताई यांचा स्मृतिदिन समारंभ कार्यक्रम महावीर भवन हिंगोली येथे संपन्न झाला. शिक्षक नायक स्व.अरुण दोंदे व स्व.सुलभाताई दोंदे यांच्या स्मृतीस राज्यभरातून आलेल्या संघटना पदाधिकाऱी यांनी अभिवादन केले. विषय नियमक समितीच्या ठरावानुसार माजी राज्याध्यक्ष प्रकाश भाई दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार सुरेश भावसार व विश्वनाथ सूर्यवंशी यांची त्रिसदस्यीय निवड समितीने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची पुढील तीन वर्षासाठी राज्य कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी राज्य अध्यक्ष पदी – देविदास बसवदे, राज्य सरचिटणीस- कल्याण लवांडे, कार्याध्यक्ष- अण्णाजी आडे, कोषाध्यक्ष – विनयश्री पेडणेकर यांची फेरनिवड करण्यात आली असून उर्वरित राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे-महिला विभाग प्रमुख -उर्मिला बोंडे,वरिष्ठ उपाध्यक्ष – किरण पाटील, कोकण विभागीय अध्यक्ष – प्रमोद पाटील, पुणे विभाग – दीपक भुजबळ, नाशिक विभाग- भगवान पाटील, अमरावती विभाग- दिगंबर जगताप, मराठवाडा विभाग – सुनील हाके, नागपूर विभाग केशव बुरडे, उपाध्यक्ष – म. ल. देसाई, व्हि.डी. देशमुख, अनिल महाजन,हरिदास घोगरे, विजय मनवर,लालासाहेब मगर,शिवानंद सहारकर, परमेश्वर बालकुंदे कार्यालयीन चिटणीस -महेश देशमुख,उपसरचिटणीस – संध्या ठाकरे संयुक्त सचिव- रवींद्र काकडे, कृष्णा चिकणे, विलास आळे, प्रशांत पारकर, मायाताई चाफले, राजेंद्र निमसे, संगीता पागृत,डी.एस.कोल्हे,दिलीप देवकांबळे, शुभांगी कचरे
राज्य संघटक- राजा कविटकर पद्मशाली डी एम, शांताराम पाटील, बाळासाहेब कदम, कांचन कडू, सविता पिसे, गुरुदास कुबल, आशाताई झिलपे, जयवंत काळे, ज्योती कुर्डुणकर, विजय पंडीत, किशोर चौधरी, संतोष लोहार, हिशोब तपासणीस-लोकेश गायकवाड, फारुक बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली.