मुंबई गोवा नॅशनल हायवेवर साळगाव ब्रिज वर केली कारवाई
आरोपी बाबाजी नाईक ला घेतले ताब्यात
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : एलसीबी च्या पथकाने तब्बल 6 लाख 85 हजार 290 रुपयांच्या गुटख्यासह टाटा कार मिळून 12 लाख 85 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या गुन्ह्यातील सावंतवाडी खासकीलवाडा येथे राहणारा आरोपी बाबाजी विजय नाईक ( वय 40 ) याला एलसीबी जे ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय महेंद्र घाग यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी च्या पथकाने मुंबई गोवा हायवेवर साळगाव येथे ब्रिजवर आज सायंकाळी 6 वाजता ही कारवाई केली. कारवाईत पोलीस हवालदार अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यशवंत आरमारकर,चंद्रहास नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरुनाथ कोयंडे, अमित पालकर सहभागी झाले होते. आरोपी बाबाजी नाईकवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.