अबोली ऑटो रिक्षा योजनेचा १८ मार्च रोजी निलमताई राणे यांच्या हस्ते शुभारंभ

पिंक रिक्षाच्या पहिल्या पाच मानक-यांना लॉटरी

५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक, उर्वरित १५ टक्के भार आ.नितेश राणे उचलणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदर्ग जिल्हा बँकेचे बँकेची माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा हि महत्त्वकांशी योजना जिल्हा बँकेने हाती घेतली आहे.या योजनेचा शुभारंभ शनिवार दिनांक १८मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता नीलम ताई राणे यांच्या हस्ते तर बँकेचे संचालक आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. यावेळी ३ महिलांना अबोली रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.

या योजनेच्या द्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार नितेश राणे स्वतः करणार आहेत

जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९% सवलतीच्या जाहीर केला असून किमतीच्या८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच,रिशा परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नितेश राणे हे करणार आहेत. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या साडेपाच लाख आहे. ही संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे लोकसंख्येने जास्त असलेल्या महिला जिल्ह्याच्या उद्योग व्यवसायात अर्थकारणात पुरुषांच्या तुलनेने दिसत नाहीत. महिलांचा हा सहभाग वाढावा त्यांनी आत्मविश्वाने पुढे यावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. तोच उद्देश ठेवून जिल्हा बँकेने ही अबोली ऑटो रिक्षा योजना अंमलात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यातून जिल्ह्यातील महिलांची हिम्मत वाढावी,त्या कष्टाने पुढे याव्यात हाच बँकेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यात विमानतळ, मोठ मोठे हॉटेल सुरू होत आहेत विविध प्रकल्प येऊ घातले आहेत विकासाच्या या पर्यायाला महिलांची साथ लाभावी व त्यानी हा विकास साधला जात असताना महिलांना रोजगार मिळावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना पुढे आणली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!