चिंदर ग्रामपंचायत व निर्भया बहुउद्देशिय सेवा भावी संस्था भुदरगड यांचे संयुक्त आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : श्री भगवती माऊली यात्रौत्सवाचे औचित्य साधून शनिवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन चिंदर ग्रामपंचायत तसेच निर्भया बहुउद्देशिय सेवा भावी संस्था भुदरगड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य मोफत औषध पुरवठा, मोफत धनुर्वात इंजेक्शन, मोफत इसीजी, शुगर तपासणी, सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी, बालकांची आरोग्य तपासणी, 40 वर्षा वरील नागरिकांची मोफत मधुमेह आणि रक्त तपासणी व वृद्ध आणि जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.
शिबीरास सरपंच नम्रता महंकाळ, पंचायत समिती माजी सभापती धोंडी चिंदरकर, हिमाली अमरे, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ. कपिल मेस्त्री, माजी सरपंच संतोष कोदे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन सीताराम हडकर, उपसरपंच दिपक सुर्वे, रामेश्वर ट्रस्ट अध्यक्ष विकास पाताडे, भगवती माऊली ट्रस्टचे धाकू घाडी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, आदीची प्रमुख उपस्थिती असणार आहे.












