खारेपाटण जि.प.केंद्र शाळेला ३ वॉटर प्युरिफाय भेट
खारेपाटण (प्रतिनिधी) : म.रा.विद्युत महा पारेषण कंपनीच्या कणकवली कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अवधूत अनंत मुळे यांच्या सहकार्यातून व महापारेषण सी एस आर फंडातून खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ या मॉडेल स्कूलला नुकतेच ३ वॉटर प्युरिफाय शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचेकडे भेट स्वरूपात सुपूर्द करण्यात आले.
यावेळी म.रा.विद्युत पारेषण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अवधूत मुळये,खारेपाटण कार्यालयाचे सहायक अभियंता प्रथमेश पाटील, वैभववाडी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सुशांत वारेकर, टेक्निशियन जयेश उबाळे, रविंद्र जाधव, सागर होळकर, अभिषेक चव्हाण, सुरक्षा रक्षक प्रवीण गाडे, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते म.रा.विद्युत पारेषण कंपनीचे कार्यकारी अभियंता वधूत मुळये यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी समितीच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष संध्या पोरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळा ही जिल्ह्यातील आदर्श शाळा असून शाळेत शिक्षकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले सर्वच उपक्रम छान असून या शाळेची मेहनत व गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याचे दृष्टीने अंदाजे सुमारे ४५००० रुपये एवढ्या किमतीचे ३ वॉटर प्युरिफाय शाळेला सी एस आर फंडातून भेट देण्यात येत असल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता अवधूत मुळये यांनी सांगितले.
तर हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, सहायक शिक्षिका अलका मोरे, आरती जोजन, समीक्षा राऊत, शिल्पा बिराजदार, अबिदा काझी, शिक्षक धूमक यांनी परिश्रम घेतले. खारेपाटण केंद्र शाळेला म.रा.विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने ३ वॉटर प्युरिफाय दिल्याबद्दल खारेपाटण जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी कार्य.अभियंता अवधूत मुळ्ये यांसह विद्युत पारेषण चे आभार मानले आहेत. तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.