मसूरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदीर येथे १४ ते १५ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव संपन्न होणार आहे. १४ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते १२.०० वा.श्री दत्तगुरूंचे पुजन व अभिषेक, दुपारी १२.०० वा.महाआरती, रात्रौ ८.०० वा.सुश्राव्य भजन (बुवा – श्री. आबा तुरी),रात्रौ ९.०० ते १०.०० वा.सोलो वादन समर्थ स्वामी समर्थ पखवाज वादन क्लासेस, विरण गुरुवर्य श्री. महेश परब कुडाळ, रात्रौ १०.०० ते ११.३० वा.दिंडीनृत्य (बुवा – श्री. दाजी परब व सहकारी वृंद), रात्रौ ११.४० वा.दिपोत्सव,रात्रौ १२.०० वा.दत्तजन्म सोहळा व पालखी प्रदक्षिणा. १५ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० महाआरती, दुपारी १.३० ते ४.०० महाप्रसाद,रात्रौ ९.०० : अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण वेंगुर्ला यांचा ‘संत गोमाई’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन समर्थ बागवे महाराज संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.