देवगड तालुक्यामध्ये अनेक गावांमधील रस्त्यांच्या बाजूला असलेल्या दगड मातींच्या ढिगा-यामुळे वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यामध्ये अनेक गावांमधील रस्त्यांच्या बाजूला विदयुत वाहिन्यांची खोदकामे करतेवेळी रस्त्यांवरती दगड व मातीचे ढिगारे पसरल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितेवेळी तारेवरची कसरत करावी लागते व अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही यामुळे सदर रस्त्यांवरती असलेली दगड व माती बाजूला करण्यात यावी अशी मागणी प्रसिध्दीपत्रकाव्दारे नगरसेवक तेजस मामघाडी यांनी केली आहे.

देवगड तालुक्यामध्ये काहि गावांमध्ये रस्त्याच्या बाजूने विदयुत वाहिन्यांचे खोदकाम चालू आहे. हे खोदकाम करतेवेळी रस्त्यावरती दगड व मातीचे ढिगारे असल्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालकांना एकेरी प्रवास करावा लागत आहे. दुस-या वाहनाला साईट देतेवेळी मोठी अडचण निर्माण होते. तसेच सदर रस्त्यावरती अपघात होण्याची दाट शक्यता टाळता येत नाही. तसेच काहि रस्त्याच्या बाजूला विदयुत वाहिन्या खोदतेवेळी रस्त्याच्या बाजूला माती,खडीचे ढिगारेही वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत. या विदयुत वाहिन्यांची कामे करतेवेळी वाहन चालकांना देखील त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे. विकासकामे हि झालीच पाहिजेत मात्र हि कामे करीत असताना वाहन चालकांचा देखील विचार केला पाहिजे. विद्युत वाहिन्यांचे खोदकाम पूर्ण झाल्यावरती ठिकाणीही काही प्रमाणात माती दगड व काम करतेवेळी पडलेले खड्डे बुजवले जात नाही यामुळे याकडेही संबंधित विभागाने लक्ष दिले पाहिजे असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे नगरसेवक तेजस मामघाडी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!