खारेपाटण येथे मोटरसायकल व कंटेनर मध्ये धडक होऊन दोन जागीच ठार 

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर खारेपाटण बॉक्सवेल ब्रिजवर आज रात्री ८.३० च्या दरम्यान मोटार सायकल व कंटेनर यांच्यात समोरासमोर  जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात मोटार सायकल स्वार सचिन एकनाथ लाड राहणार हसोळ तळी,राजापूर वय ३५ हा जागीच ठार झाला असून त्याच्या सोबत असलेला तानाजी वामन शेळकर वय 30 राहणार कोडवशी,राजापूर शिळकर वाडी हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी प्रा.आ.केंद्र येथे नेला  असता तो सुधा मयत झाला.

याबाबत अधिक वृत्त असे की, हासोळ येथील बाईक स्वार आपल्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल क्र.एम एच ०८ एक्स ४२५२ घेऊन खारेपाटण मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवर आला असता खारेपाटण बॉक्सवेल ओवर फ्लाय ब्रिजवर चूकीच्या साईडने जात असल्याने कणवलीच्या दिशेने आलेला व मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर वाहन क्र.एम एच ४६ सी एल ३१५८ यांची समोरासमोर धडक होऊन मोटार सायकलस्वार सचिन लाड जागीच ठार झाला.तर त्याच्या सोबत असलेला तानाजी शेळकर हा गंभीर जखमी झाला आहे.त्याला १०८ वाहनाने पुढील उपचारासाठी खारेपाटण प्रा.आ.केंद्रात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस श्री माने व मोहिते हे घटनास्थळी दाखल झाले.तर कणकवली पोलीस निरीक्षक श्री मुंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री देसाई यांनी  खारेपाटण येथे अपघात स्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली.अधिक तपास  खारेपाटण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!