मसूरे (प्रतिनिधी) : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, मुंबई यांच्या मध्य मुंबई विभागाच्या वतीने 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता 10वी, 12वी व पदवी या परीक्षांमध्ये 60% हून जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार रघुनाथ घाडीगावकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 4 वा. समाज संस्थेच्या मध्य मुंबई विभागाच्या वतीने मुंबई तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील घाडीगावकर समाजातील वधू-वरांचा आणि पालकांचा परिचय मेळावा प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह, दादर (पूर्व), मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा समाजाच्या वधू-वर परिचय समितीचे प्रमुख सल्लागार कै. शशिकांत महादेव घाडीगावकर (गोठणे) यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते रघुवीर वायंगणकर नारिंग्रे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा समाजाचा 19 वा राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा असून, यासाठी समाजातील विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील वधू आणि वराने त्याचबरोबर त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या लग्नाविषयी सूयोग्य जोडीदार शोधण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबतची नावे नोंदविण्यासाठी विकास घाडीगावकर (8879771965 )व दर्शना घाडीगावकर (9769009822) तसेच रघुनाथ घाडीगावकर (9869654768 ) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व विभागातील समाज बांधवांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन समाजाच्या मध्य मुंबई विभागाच्यावतीने सरचिटणीस रामचंद्र यशवंत घाडीगावकर (इळये) यांनी केले आहे.