न्यू इंग्लिश स्कूल ओरस शिक्षक वृंदांनी पोलीस पाटील दिनानिमित्त निवासस्थानी भेट देत केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव ब्रिजवर शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या अपघातात नंतर तातडीने मदतीला धावून जाणाऱ्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा सत्कार आज पोलीस पाटील दिनानिमित्त दि. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल ओरस येथील शिक्षक वृंद संजिव मधुकर राणे, फ्रान्सिस मार्यन फर्नांडिस यांनी नांदगाव पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्या निवासस्थानी भेट देत सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील मध्ये असलेल्या डिवायडर संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा ४ डिसेंबर च्या मध्यरात्री २ च्या सुमारास अपघात झाला होता.
या अपघातानंतर लगेच हायवे लगत असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांनी आजुबाजूला असलेल्या ग्रामस्थांना संपर्क साधून अपघातातील आरडाओरडा करणारे विद्यार्थी यांच्या मदतीला धावून गेल्याने ज्या विद्यार्थ्या़ंच्या एस टी बसला अपघात झाला होता ती दि कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल ओरस येथील शिक्षक वृंद संजिव मधुकर राणे ,फ्रान्सिस मार्यन फर्नांडिस यांनी आज पोलीस पाटील दिनानिमित्त नांदगाव पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्या निवासस्थानी भेट देत सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याच हायवेलगत बाजूला असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचे घर असल्याने त्यांना तो आवाज येताच त्यांनी याबाबत तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली होती. मग लगेचच पोलीस पाटील वृषाली मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत , प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत कार्यात मदत करुन तसेच मुलांनाही धीर दिला होता.