बिल्डर उदय पवार यांच्या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने लागली आग ; लाखोंचे नुकसान

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंची दक्षता ; तात्काळ घटनास्थळी जात विझवली आग 

कणकवली (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक उदय लवू पवार यांच्या कणकवली सोनगेवाडी येथील कृपासावली या बंगल्याला शॉर्ट सर्किट ने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्याचे समजताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पहाटे 4 वाजता नगरपंचायत च्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीत बिल्डर उदय पवार यांच्या ऑफिसमधील सर्व महत्वाची कागदपत्रे फर्निचर जळून खाक झाले.घरातील टीव्ही एसी फर्निचर पीओपी जळाले. बिल्डर उदय पवार यांचा सोनगेवाडी येथे शेळके हॉस्पिटलनजीक पवार बिल्डिंग लगत दुमजली बंगला आहे. 18 डिसेंबर रोजी भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट ने त्यांच्या बंगल्यातील तळमजल्यावरील ऑफिसला आग लागली.त्यांनंतर ही आग पसरत हॉल मध्ये आली. उदय पवार व त्यांचे वडील लवू पवार हे पहिल्या मजल्यावर बेडरूम मध्ये झोपले होते.आगीमुळे तळमजल्यावरील जळत असलेल्या फर्निचर व अन्य साहित्याच्या आवाजामुळे व धुरामुळे त्यांना जाग आली.तसेच बंगल्या

लगत च्या पवार बिल्डिंगमधील नागरिकांनाही आगीमुळे जाग आली.स्थानिक नागरिकांनी घरातील पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती.निखिल आचरेकर यांनी तात्काळ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याना घटनेची कल्पना देताच नलावडे यांनी तात्काळ कणकवली नगरपंचायत च्या अग्निशामक बंबासह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आगीमुळे पहिल्या मजल्यावर अडकलेल्या लवू पवार व उदय पवार यांना शिडीच्या साहाय्याने खाली उतरविण्यात आले. याबाबत माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे यांनी घटनास्थळी प्राथमिक पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!