ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामध्ये सन 2022 पासुन AMBIS (Automated Multi-Model Biometric Identification System), NAFIS तसेच MCU (Measurement Collection Unit) ह्या संगणकीय यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेल्या असुन या संगणकीय प्रणालीमध्ये जिल्हयातील पोलीस स्टेशनमध्ये दैनंदिन अटक होणाऱ्या प्रत्येक आरोपींचा डेमोग्राफीक डाटा या प्रणालीमध्ये संकलीत केला जातो.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, यांच्या मार्गदर्शनखाली अंगुली मुद्रा विभाग कार्यरत असुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व अंगुलीमुद्रा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मागाडे, यांनी चालु वर्षामध्ये अंगुली मुद्रा विभागामार्फत 96 गंभीर गुन्हयांमध्ये घटनास्थळी भेट देवुन आरोपीं विरुध्द भौतीक पुरावे गोळा करुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 05 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यामध्ये पोलीस ठाणे सिंधुदुर्गनगरी – 01, पोलीस ठाणे सावंतवाडी 02 तसेच पोलीस ठाणे कणकवली 02 या पोलीस स्टेशनचा – समावेश आहे. सदर शाखेमध्ये पोलीस हवालदार संतोष सावंत, पोलीस नाईक संकेत खाडये तसेच पोलीस नाईक कमलेश सोनवणे हे कामकाज करीत आहेत.
गंभीर गुन्हयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलीस दल हे आरोपी विरुध्द भक्कम पुरावा उपलब्ध करुन गुन्हे उघडकीस आणुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्याचे दृष्टीने प्रयत्नशिल आहेत.