नामदार नितेश राणेंना मंत्रिपद कारभाराच्या पहिल्या दिवशी भाजपा उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी दिल्या शुभेच्छा

मंत्री नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग विकासाला येणार मोठी गती ; जानवली जि प मतदारसंघाला मिळेल मोठा विकासनिधी- संदीप सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार नितेश राणे यांची नागपूर येथील विधानभवनात भेट घेत भाजपा कणकवली उपतालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज हिवाळी अधिवेशनात मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी नामदार नितेश राणे यांचे विधिमंडळात आगमन झाले. त्यावेळी सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. कॅबिनेट मंत्री नितेश राणेंमुळे सिंधुदुर्ग च्या विकासाला आणखी गती येणार आहे. पर्यटन रोजगार मूलभूत सुविधा आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रांत भरीव विकास कामे मार्गी लागतील. जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासकामांसाठी भरघोस निधी मोठ्या प्रमाणात मिळेल अशी प्रतिक्रिया संदीप सावंत यांनी दिली.

error: Content is protected !!