अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी केला यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बांदा कास येथील शिमगोत्सवात पीडित फिर्यादिना जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी नामंजूर केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी अट्रोसिटी कायद्याखाली प्रथमदर्शनी केस कशी आहे हे न्यायालयासमोर दाखवून देत यशस्वी युक्तिवाद केला. बांदा कास येथे शिमगोत्सवात रस्त्यात अडवून पीडित फिर्यादिना जातीवाचक शिवीगाळ करत संशयित आरोपींकडून धक्काबुक्की केली होती.8 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजुज 45 मिनिटांनी ही घटना घडली होती. या प्रकरणात पीडितांच्या फिर्यादिनुसार कास ता सावंतवाडी येथील आरोपी विठोबा भाईप, संदेश भाईप, अनिल भाईप, मनोज भाईप, विश्वनाथ भाईप यांच्याविरोधात अट्रोसिटी ऍक्टनुसार तसेच आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी डॉ रोहिणी सोळंके करत आहेत. न्यायालयात युक्तिवाद करताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी आरोपी व फिर्यादी साक्षीदार हे एकाच गावातील असल्यामुळे जामीन मंजूर झाल्यास साक्षीदार व फिर्यादी यांच्यावर दबाव येऊ शकतो, फिर्यादींच्या कुटुंबियांस अफोपिंकडून धोका पोचू शकतो, आरोपी गुन्ह्यातील पुरावे नष्ट करू शकतात आदी मुद्दे नमूद केले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांनी पाचही आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला.