प्रसिद्ध चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर यांची अफलातून कलाकृती
चौके (अमाेल गाेसावी) : ‘उधळा गुलाल, वाजवारे नगारे‘ ‘त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले’
”अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद,अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी”
“अशक्य हि सारे करितो शक्य” एक क्षणात “भिऊ नकोस मी पाठीशी आहे” असे सदा सांगे आम्हास.
आज २३ मार्च म्हणजे अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन. या दिनाचे औचित्य साधून स्वामी भक्तांना अनोख्या पध्दतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा आगळ्यावेगळ्या पध्दतीने देण्यासाठी मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा चे कलाशिक्षक तथा प्रसिद्ध चित्रकार तसेच रांगोळीकार समीर चांदरकर यांनी आपल्या अंगणातील बांधकामासाठी आणलेल्या वाळूमधील विविध रंगीत दगडांमधून अप्रतिम अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा साकारली आहे. चांदरकर यांच्या या नावीण्यपूर्ण कलाकृतीबद्दल सोशल मिडीया सह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.