शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पेंडूर मांड उत्सवास भेट देऊन घेतले दर्शन

देवस्थान ट्रस्टच्या वतीने दत्ता सामंत यांचा करण्यात आला सत्कार

चौके (अमोल गोसावी) : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उद्योजक दत्ता सामंत यांनी आज सायंकाळी पेंडूर येथील सुरू असलेल्या त्रैवार्षिक मांड उत्सवास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दीपा सावंत, अमित सावंत, राजा सामंत हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री दत्ता सामंत यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सचिव अमित कुळकर्णी, खजिनदार सुनील परब, विश्वस्त दाजी सावंत,रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, सामाजिक कार्यकर्ते दीपा सावंत, जयंद्रथ परब आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी असे प्रतिपादन केले की पेंडूर मांड उत्सवाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. श्री देव वेताळ देवी सातेरीने सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कराव्यात, देवस्थान ट्रस्टला या निमित्ताने मी आश्वासित करतो की देवाला या संदर्भात अथवा गावच्या विकासासंदर्भात कोणतेही काम असेल अथवा अडचण असेल तर ती माझ्या परीने मदत करून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.

error: Content is protected !!