चौके (प्रतिनिधी) : भोगवे चिंदरवाडी येथील पुरातन श्री महोत्कट गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे माघी श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार ३० जानेवारी रोजी सकाळी श्री पूजन व दुपारी नेवाळी श्री पूजन व समाराधना. शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी श्री मूर्ती अभिषेक, दुपारी १२/५ नैवेद्य, रात्र आरती श्री गणेश पुराण वाचन व किर्तन, आणि शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री अभिषेक अनुष्ठान, किर्तन व जन्म सोहळा, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी आरती, पुराण वाचन, व किर्तन, रात्रौ जागर पहाटे कीर्तन व रत्नाकर कोचरेकर यांचे लळीत अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
