फोंडाघाटचा सुपुत्र उमेश फोंडेकर यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट जाहीर !

प्रतिकूल परिस्थितीला संधी मानून घेतलेले परिश्रम आणि यथोचित गुरुजनांचे- पालकांचे मार्गदर्शन माझ्या यशाचे वाटेकरी- डॉ.उमेश फोंडेकर !

कणकवली विद्यामंदिर हायस्कूल,मराठे कृषी विद्यालय -फोंडा, दापोली कृषी विद्यापीठ आणि फोंडा ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडेकरवाडी- फोंडाघाटचा सुपुत्र उमेश रामदास फोंडेकर यांनी, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठातून वनस्पती रोगशास्त्र विषयातून डॉक्टरेट – (आचार्य ) पदवी, प्रथम श्रेणी- विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. नुकतेच त्यांना डॉक्टरेट मिळाल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे. यासाठी त्यांना या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. जीवन कदम यांचे मार्गदर्शन, तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी यांचे प्रोत्साहन लाभले. ” इपिडेमिओलॉजी अँड मॅनेजमेंट ऑफ ब्लाइट डिसिजन ऑफ ब्रिंजल कॉसड अल्टरनारिया अल्टरनाटा(फ्र.)केसलर ” या वनस्पतीशास्त्र विषयावर त्यांनी संशोधन करून हे प्राविण्य मिळवले आहे.

घरात शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना,अत्यंत प्रतिकूल परिस्थिती हीच संधी मानून त्यांनी प्रामाणिक परिश्रम घेतले. या प्रत्येक टप्प्यावर, त्यांना योग्य गुरुजन- मित्रांचे सहकार्य लाभले. उच्च शिक्षणासाठी कुटुंबीयांनी प्रोत्साहनपर साथ दिली. हे सर्वजण माझ्या यशाचे मानकरी आहेत अशी भावना डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर डॉ.उमेश यांनी व्यक्त केली. त्यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा नंबर तीन, कणकवली येथे तर, माध्यमिक विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे झाले. नलिनी शांताराम पंत वालावलकर- देवगड येथे महाविद्यालयीन तर बीएससी ऍग्री स्व. राजाराम मराठे कृषी विद्यालय फोंडा येथे पार पडले एम. एस. सी, पदव्युत्तर दापोली कृषी विद्यापीठ येथे तर कृषी शास्त्रज्ञ चायना मंडळातर्फे वनस्पती रोग शास्त्र या विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते सावर्डे कृषी विद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून भविष्यात संशोधन क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा मानस आहे डॉ. उमेश फोंडेकर यांचे त्यांच्या अध्यापन संस्थांकडून, मित्रपरिवार कुटुंबीय आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!