चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव मोरेश्वर गणपती मंदिर येथे शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ६.०० वाजता श्री देव मोरेश्वर अभिषेक पूजा, सकाळी ८.०० वाजता दर्शन आणि नवस फेडण्यास सुरुवात, दुपारी १२.०० वाजता महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, दुपारी २.०० ते ४.०० वा. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, दुपारी २.३० वाजता स्थानिक भजने, रात्रौ ८.३० वा. मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार, आणि रात्रौ १०.०० वाजता श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचे ट्रीकसिन युक्त महान पौराणिक नाटक होणार आहे. अशाप्रकारे दिवसभर भरगच्च विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या उत्सवाचा भाविकांनी व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव मोरेश्वर मित्रमंडळ धामापूर सडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

