शिक्षण मंत्री जिल्ह्याचे उपोषण शिक्षक डीएड बेरोजगार उमेदवारांचे

जिल्ह्यातील शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाला घटना भूषणावह नाही- अमित सामंत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएड बेरोजगारांनी आपल्याला शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी आमरण उपोषण दिनांक २७ मार्च पासून सुरूवात केले असून त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही महिला आपल्या तान्हूल्या बाळासह उपोषणात सहभागी झाल्या आहेत. मात्र, अशा परिस्थितीत प्रशासनाचे अधिकारी सोडाच पण या जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे स्थानिक असूनही आज तीन दिवस झाले तरी उपोषणस्थळी साधी भेट देऊ शकत नाहीत, हे या जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जिल्ह्यातील शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाला ही घटना भूषणावह नसल्याचे म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपोषणकर्ते डीएड बेरोजगार तरुणांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करण्यात आला असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र विधानमंडळाचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामार्फत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजी घोगळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर भाई शेख आदी उपस्थित होते.

गेले दोन दिवस शिक्षण मंत्री जिल्ह्यात विविध ठिकाणी दौऱ्यात सहभागी आहेत पण ज्या खात्याची जबाबदारी आहे त्या विभागाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएड बेरोजगारांचे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे, त्यांचे प्रश्न सोडाच पण शिक्षणमंत्री त्या बेरोजगारांची भेट घेण्याचे सुद्धा औदार्य दाखवत नाहीत, म्हणजे सत्तेची धुंदी कशी असते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. दिपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघ मर्यादित आमदार असतील पण या महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री आहेत हे ते कदाचित विसरले असतील. त्यामुळेच त्यांना ओरोस येथे बेरोजगारांच्या उपोषणस्थळी भेट देण्याचा विसर पडला असेल, हे निंदनीय आहे, असे मत व्यक्त करून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!