लोरे नं 2 सोसायटी चेअरमनपदी छोटू रावराणे, व्हाईस चेअरमनपदी सुरेश नाचणेकर यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावच्या सोसायटी च्या चेअरमन पदी छोटू गणपत रावराणे तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश भिकाजी नाचणेकर यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली.

एक महीना आधी संस्थेची निवडणूक जाहीर झाली होती गावातील संस्थेच्या सभासद यांनी एकत्रित येत निवडणूक बिनविरोध केली यामध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक छोटू गणपत रावराणे श्री सुरेश भिकाजी नाचणेकर,रितेश गणपत सुतार,गणेश काशीराम पेडणेकर,कृष्णा नारायण गोसावी,भास्कर पुंडलिक पांचाळ,ममता विश्वास पेडणेकर,स्वाती संजय पेडणेकर,देऊ धोंडू मांजलकर,विनोद भगवान परवडे,सुभाष भास्कर कुडतरकर,प्रकाश धोंडू गोरुले,किशोर भिकाजी घावरे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडणूक आले होते.ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावचे सरपंच विलास नावले, माजी सरपंच महेंद्रराव राणे, माजी सरपंच नानाराव राणे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र रावराणे, ग्रामपंचायत सदस्य रितेश सुतार, माजी चेअरमन प्रमोद पांचाळ, अनिल नरम, दशरथ बोपकर, दिगंबर राव राणे, नारायण म्हादये, धाकोजी सुतार, रवींद्र उर्फ बाळाराव राणे यांच्या सहकार्यातून ही निवडणूक बिनविरोध पार पडली

error: Content is protected !!