एलसीबी ची खोटलेमध्ये मध्यरात्री 2 वाजता कारवाई
आरोपी कणकवली, मालवण कुडाळ , सावंतवाडी तालुक्यातील
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मालवण तालुक्यातील खोटले गावात धनगरवाडी डोंगराळ भागात चोरी छुपे सुरू असलेल्या अंदर बाहर जुगार अड्ड्यावर एलसीबी ने 1 एप्रिल रोजी मध्यरात्री 2 वाजता छापा टाकून रोख रक्कमेसह 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 1 लाख 43 हजार 500 रुपये रोख रक्कमेसह चार फोर व्हीलर एक मोटरसायकल असा 38 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात 13 आरोपींना घटनास्थळी पकडण्यात आले असून दोघे पसार झाले आहेत. कणकवली तालुक्यातील 6 मालवण तालुक्यातील 4 कुडाळ तालुक्यातील 2 आणि सावंतवाडी तालुक्यातील 3 असे एकूण 15 आरोपी आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पी.एस.आय. समीर भोसले, पी.एस.आय. रामचंद्र शेळके, पी.एस.आय. सुधीर सावंत, ए एसआय राजू जामसंडेकर, हवालदार प्रमोद काळसेकर, किरण देसाई, आशिष गंगावणे, अनुप खंडे, प्रकाश कदम, आशिष जामदार हवालदार सदानंद राणे, पोलिस नाईक चंद्रकांत पालकर हवालदार, बस्ताव डिसोजा, ए एस. आय. गुरुनाथ कोयंडे, सुरेश राठोड आदींसह एलसीबी च्या पथकाने ही कारवाई केली.












