कणकवली (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २४/२५ मध्ये इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा २०२४ मध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील विद्याथी कुमार पियुष मकरंद वायंगणकर याने ड्रॉइंग विषयात. राज्य गुणवंत्ता व राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत स्कॉलरशिपचा मानकरी ठरला आहे. पियुषच्या या यशात स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख पी. एन. मसुरकर सर,चित्रकला शिक्षक गुरव सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. पियुषच्या या यशाबद्दल प्रशाला मुख्याध्यापक एस. डी. दळवी सर, पर्यवेक्षक बी. एम. बुराण सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संस्था अध्यक्ष सतिश सावंत आणि पदाधिकारी शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत सर आणि पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
