डॉ.एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत लोरे नं.1 शाळेने केले उज्वल यश संपादन

कणकवली (प्रतिनिधी) : सन 2025 मध्ये घेण्यात आलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत शाळा लोरे नंबर एक या शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. शाळेचा विद्यार्थी चैतन्य मनोज गवाणकर इयत्ता चौथी 272 गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवून इस्रोसहली साठी निवड झाली आहे.तसेच हार्दिक राणे 126,आराध्या राणे176 गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच इयत्ता सातवी मधील कुमार हर्ष प्रकाश तेली याने 214 गुण मिळवून तालुक्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे .याशिवाय स्मित सावंत 182 मधुरा तेली 184 स्वरूपा कदम 180 गुण मिळवले आहे. या परीक्षेत इयत्ता सातवी मधून कणकवली तालुका टॉप टेन मध्ये तीन विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा लोरे गावचे सरपंच आदरणीय श्री.अजय रावराणे तसेच कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती श्री.मनोज रावराणे यांचे मार्फत भेटवस्तू देऊन नुकताच गौरव करण्यात आला. इंग्रजी माध्यमांपेक्षा मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला जातो असे गौरवोद्गार माजी सभापती मनोज रावराणे यांनी याप्रसंगी काढले काढले शाळेच्या उज्वल परंपरेबद्दल सर्व मान्यवरांनी सर्व शिक्षकांचे मनस्वी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सतीश गोसावी,विलास करावडे रचना गवाणकर , सुरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यां गुणगोरव कार्यक्रमास सरपंच श्री अजय रावराणे माजी सभापती मनोज रावराणे ग्रामपंचायत सदस्य नरेश गुरव तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश रावराणे मारुती रावराणे सुनील रावराणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रूपेश सावंत उपाध्यक्ष सिमरन गुरव तसेच पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!