डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कणकवली येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेना करणार अभिवादन

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोमवार दि. १४ एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता कणकवली शहरातील बौद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!