देवगड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी च्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार ६ एप्रिल रोजी पडेल भाजपा मंडल च्या वतीने विमलेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला. यावेळी पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, पडेल मंडल प्रभारी डॉ अमोल तेली, जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, माजी पंचायत सभापती रवी पाळेकर, तालुका सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर, विभागप्रमुख संदीप तावडे, वाडा सरपंच सुनील जाधव, अविनाश सहस्रबुद्धे, विनायक गुरव, भाई गुरव आदी उपस्थित होते.भाजपा पक्षाची विजयी घोडदौड अशीच चालू राहून भारत देशाची सेवा भाजपाच्या माध्यमातून घडू दे. जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेला भाजपा एकमेव पक्ष असून महाराष्ट्रात सदस्य संख्या दीड कोटी झाली आहे. याहीपुढे भाजपा पक्षवाढ होऊन भाजपची विजयी घोडदौड सुरू राहू दे असे साकडे विमलेश्वर चरणी घालण्यात आले.














