शिवसेना उबाठा चे कणकवली उपतालुकाप्रमुख राजू रावराणे भाजपात
पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते केला पक्षप्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात शिवसेना उबाठा पक्षावर कडवी टीका करून सळो की पळो करून सोडतानाच सिंधुदुर्गात ही पालकमंत्री नितेश राणे उबाठा पक्षाला धक्के पे धक्के देत आहेत. उबाठा चे कणकवली उपतालुकाप्रमुख तथा लोरे गावचे माजी सरपंच राजू रावराणे यांनी राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला. यावेळी उबाठा चे सत्यविजय राणे, दिलीप रावराणे, उत्तम राणे, बाळा रावराणे, नारायण तेली यांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबन हळदिवे, महेश रावराणे उपस्थित होते.











