सावंतवाडीत १४ मेला होणार कविता ते गझल कार्यशाळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १४ मेला कविता ते गझल” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नांव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत काव्यगुरू कवी-गझलकार विजय जोशी (विजो) (डोंबिवली, मुंबई) मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सावंतवाडी येथे संपन्न होईल. या कार्यशाळेतील अभ्यासक्रम मात्रा म्हणजे काय, त्या कशा मोजतात आणि त्याचा सराव, वृत्त म्हणजे काय, मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछेद यांची माहिती आणि सराव गझलतंत्र आणि सराव प्रश्नोत्तरे आणि खुली चर्चा होणार आहे. तरी नावनोंदणीसाठी दीपक पटेकर:- ८४४६७४३१९६ / ९४२१२३७५६८ संतोष सावंत

error: Content is protected !!