मालवण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळाकडून मालवण तालुक्यातील मालोंड येथील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप करण्यात आले. राज्य सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस 23 जून रोजी साजरा होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन जिल्ह्याभरात करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप करण्यात आले. यावेळी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, राकेश परब, मालोंड सरपंच फणसगावकर, पोलीस पाटील हर्षद घाडीगांवकर, दया देसाई, वडाचापाट उपसरपंच सचिन पाताडे, मसदे माजी सरपंच आंबेरकर, विलास पांजरी, पंकज परब,राजू परब, जितू परब तसेच राकेश परब मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप












