बोर्डवे येथील श्री इसवटी ब्राह्मणदेव मंदिराचा 7 मे राेजी वर्धापन दिन

धार्मिक विधींसह नाटक, समई नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोर्डवे येथील श्री इसवटी ब्राह्मणदेव मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दि. ७ मे व शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात दोन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून सर्व भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन तेली परिवार व समस्त ग्रामस्थ बोर्डवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुवार दि. ७ मे रोजी दुपारी २ वाजता मुलांचे व महिलांचे फन गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ वाजता “होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता “वाट चुकलो देव” हे दोन अंकी हृदयस्पर्शी नाटक सादर करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि. ८ मे रोजी सकाळी ८ वाजता श्री इसवटी ब्राह्मणदेव अभिषेक व लघुरुद्र होणार आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद कार्यक्रम होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ६ वाजता श्री सत्यनारायण महाआरती व स्थानिक भजन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ७ वाजता “कोकणची शान” म्हणून ओळखले जाणारे गवळदेव समई नृत्य, बोर्डवे सुंदरवाडी यांच्याकडून सादर केले जाणार आहे. रात्री १० वाजता “गाव तसो चांगलो” हे दोन अंकी धमाल मालवणी नाटक रंगणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना परिसरातील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!