दादा कुडतरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 11 जुलै रोजी कणकवलीत शोकसभा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यकर्ते सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे गुरुवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. यानिमित्ताने प्रवासी संघ, जेष्ठ नागरिक, ग्राहक पंचायत, पेन्शनर व रोटरी क्लब यांच्यावतीने शुक्रवार ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता कलमठ येथील पेन्शनर भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी या शोकसभेला बिबिध संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक मित्रपरिवार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व समन्वयक मनोहर पालयेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!