आर. टी. एस. परीक्षेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्याचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी आर टी एस इ या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच खारेपाटण हायस्कूल येथे विशेष सत्कार हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप सर यांच्या शूभहस्ते करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ या वर्षी घेण्यात आलेल्या आर. टी. एस. इ.परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यानी आपली गुणवत्ता सिद्ध करत आपल्या शाळेची मान ऊंचावली आहे.यामध्ये दूसरीतील विद्यार्थिनी कुमारी – सुखदा संतोष राऊत हिने १४८ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. व तीसरीतील विद्यार्थिनी कुमारी स्वरा मिलिंद डोळ हिने १५६ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, तर पाचवीतील विद्यार्थी रितेश गोरक्षनाथ गायकवाड याने १०२ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.व सहावी तील अनुराग सचिन महिंद्रे १३० गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, ताजीन मुश्ताक पटेल १२२ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, सातवीतील संस्कृती संजय भोर १२२ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम, आठवीतील आयुष प्रशांत मांगले ७८ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय, नववीतील इकरा नजीर मुकादम १०४ गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.या सर्व विद्यार्थ्याना जिल्हा स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसूलकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.

error: Content is protected !!