कोल्हापूरमध्ये अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; तब्बल 11.83 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सुचनांनुसार अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे.दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करवीर तालुक्यातील आंबेवाडी गावाच्या हद्दीत कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर टाटा इंट्रा मालवाहू वाहन (क्र. MH-09-FL-7564) अडवून सापळा रचण्यात आला. वाहनाची झडती घेतली असता विविध नामांकित ब्रॅण्डच्या ३ लाख ८३ हजार ४५६ रुपयांची परदेशी दारू आढळून आली. त्यासह ८ लाख रुपयांचे मालवाहू वाहन जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ११ लाख ८३ हजार ४५६ रुपये एवढी आहे.

या कारवाईत विशाल रमेश कांबळे (रा. वाकरे, ता. करवीर) व युवराज महादेव पाटील (रा. नणंद्रे, ता. पन्हाळा) यांना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी हा मुद्देमाल रोहित वाईन्स, लक्ष्मीपुरी येथून खरेदी करून शाहुवाडी तालुक्यातील टर्निंग पॉईंट (बांबवडे) व मैत्री हॉटेल (बांबवडे) येथे विक्रीसाठी नेत असल्याचे कबूल केले.

या कारवाईतून ८ पीएम स्पेशल, रॉयल स्टॅग, ओल्ड मंक रम, ब्लेंडर प्राईड, बडवायझर, रोमानो वोडका, गोवा जिन, पोर्ट वाईन अशा विविध ब्रॅण्डच्या हजारो बाटल्या जप्त करण्यात आल्या.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार सो, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने केली. पथकात पो.अं. अनिकेत मोरे, योगेश गोसावी, सचिन जाधव, वैभव पाटील, समीर कांबळे, विशाल चौगले, प्रदीप पाटील, विनायक चौगले, अमित मर्दाने, वसंत पिंगळे, गजानन गुरव, राजू कोरे व विजय इंगळे यांचा समावेश होता.

error: Content is protected !!