कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले कपिल गडेकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यावतीने घेतलेल्या सहाय्यक पात्रता प्राध्यापक परीक्षा अर्थात सेट या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. कपिल गडेकर हे हुशार व होतकरू प्राध्यापक असून ऍनालिटिकल केमिस्ट्री या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शामराव दिसले, प्रा. अविनाश पोरे व प्रा. हेमंत गावित यांचे मार्गदर्शन मिळाले.
कणकवली महाविद्यालयातील प्राध्यापक कपिल गडेकर यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक पदाची पात्रता सिद्ध केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त सदस्य व प्राचार्य युवराज महालिंगे यांनी अभिनंदन केले आहे.












