कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील ग्रामीण भागातील आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. संजय राणे हे कणकवली महाविद्यालयात ३४ वर्षापासून सेवा करीत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाने संजय राणे यांना पुरस्काराने सन्मानित केले.
कणकवली महाविद्यालयाला हा सन्मान पहिल्यांदाच प्राप्त झाला झाला असून संजय राणे यांच्या रूपाने महाविद्यालयाचा लौकिक विद्यापीठ स्तरावर वाढला आहे. याबद्दल संजय राणे यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व विश्वस्त, सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.












