१२५ नागरिकांच्या आरोग्याची करण्यात आली मोफत तपासणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या शेर्पे उपकेंद्र येथे आज गुरुवार दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ शेर्पे गावच्या सरपंच स्मिता पांचाळ यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. या कार्यक्रमाला कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे, शेर्पे उपसरपंच सिराज मुजावर माजी सरपंच निशा शेलार, ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत शेलार, शीतल कांबळे, सायली पांचाळ, कुरंगावणे ग्रा.पं.सदस्य विशाखा राऊत, रवींद्र पवार, यांसह खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, आरोग्य समुदाय अधिकारी प्रणव पाटील,ऋषिकेश माने, प्रणाली बाणे, स्नेहा जाधव, आरोग्य सहाय्यक प्रवीण भागवत, आरोग्य सहाय्यीका मंजिरी बावकर, आरोग्य सेविका दीपाली दुखंडे, प्रमिला पाटणकर, आरोग्य सेवक गणेश तेली, रवींद्र नायकोजी, आशा स्वयंसेविका गतप्रवर्तक संकिता पाटणकर, आशा वैष्णवी पवार, सरिता शेलार, मदतनीस प्रमिला शेलार, लॅब असिस्टंट वेदा मालंडकर, वाहन चालक सिंदूर लवेकर आदी पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी मान्यवर उपस्थित होते.
भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.१७ सप्टेंबर २०२५ ते दि.२ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आला असून यादरम्यान गावातील महिला आरोग्य दृष्टीने निरोगी व सक्षम राहिल्या पाहिजेत तर देश सक्षम होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर राबविला जात असून या अभियानात आरोग्य तपासणी बरोबर नागरिकांचे ABHA कार्ड व PMJAY कार्ड काढून देण्यात येणार आहेत. तर NCD screening करणे,गरोदरमाता तपासणी, लसीकरण करणे, समुपदेशन व MCP Card वाटप करणे, समतोल आहार प्रदर्शन व संशयित क्षय रुग्ण थुंकी तपासणी तसेच फिजिओथेरपी मार्गदर्शन,HLL lab मार्फत रक्त तपासण्या व मोफत किरकोळ औषधे वाटप करणे आदी उपक्रम राबविण्यात आले.यावेळी शेर्पे उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या शेर्पे, कुरंगवणे,बेर्ले व चिंचवली या गावातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य कर्मचारी श्री गणेश तेली यांनी केले.















