कणकवलीत ७ नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : बाळगोपाळ व टेंबवाडी मित्रमंडळ यांच्यावतीने वैभव मालंडकर पुरस्कृत नरकासुर स्पर्धा शनिवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. शहरातील गणपती साना येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १५ हजार रु., १० हजार रु., ५ हजार रु. व चषक, व इतर बक्षिसे ठेवली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळा सेलिब्रेटींच्या उपस्थित होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नयन यादव, प्रथमेश परब, ओंकार सुतार, सोमनाथ पारगावकर यांच्याकडे संपर्क साधावा.

error: Content is protected !!