वाढदिनी शुभेच्छांचे बॅनर झळकले
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जठार प्रेमींनी प्रमोद जठार… भावी खासदार अशा शुभेच्छा बॅनरद्वारे दिल्या आहेत. सुनील श्रीधर खाडये यांनी कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या बॅनरवर संसदभवन फोटो आणि संसदभवन फोटोवर बोलताना प्रमोद जठार यांची छबी असलेला बॅनर लावला आहे. हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.-भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. प्रमोद जठार हे संपूर्ण रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मागील 2 वर्षे प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. विशेषतः या लोकसभा मतदारसंघातील उत्तर रत्नागिरी च्या भागात भाजपा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पक्षाचे विविध कार्यक्रम, पक्षसंघटनवाढीसाठी प्रमोद जठार हे प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे प्रमोद जठार हे 2024 साली लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा जोरात सुरू आहे.