सिंधुदुर्ग आरटीओच्या महसूलात वाढ

एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल जमा ; नंदकुमार काळेंची माहिती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आरटीओच्या महसूलात कमालीची वाढ झाली असून आतापर्यंत एकूण ५६ कोटी ५२ लाख महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे अशी माहिती नंदकुमार काळें यांनी माध्यमाशी बोलताना माहिती दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या महसूल वसुलीमध्ये १३.५६ कोटीची इतकी वाढ झाली आहे. त्याशिवाय वाहन नोंदणीमध्ये दुचाकी २४०० चारचाकी २९२ तर परिवहन संवर्गात ५२५ ची वाढ झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांनी दिली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध वसुलीच्या माध्यमातून सुमारे ५६ कोटी ५२ लाख उत्पन्न मिळाले. यामध्ये मोटार सायकल नवीन नोंदणी- १० कोटी ७५ लाख, कार नवीन नोंदणी १९ कोटी ८५ लाख, परिवहन संवर्गातील नवीन वाहने १ कोटी ५५ लाख, जुना कर -३ कोटी ६७ लाख, परिवहन वाहनांचा कर ६ कोटी ९ लाख, पर्यावरण कर १ कोटी १७ लाख, रस्ता सुरक्षा सेस ७६ लाख, शुल्क ८ कोटी ८९ लाख, तडजोड शुल्क (दंड) २ कोटी ८६ लाख प्रवासी कर १ कोटी १ लाख अस एकूण 56 कोटी ५२ लाख महसूल वसुली झाली आहे.

नवीन वाहन नोंदणी कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ कालावधीत जिल्ह्यात दुचाकी १० हजार ६४७, चारचाकी १ हजार ८४४ परिवहन १ हजार ५९० अशा एकूण १४ हजार ८१ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. गत आर्थिक वर्ष सन २०२१-२२ च्या तुलनेत दुचाकी वाहन नोंदणीमध्ये २ हजार ४००, चारचाकी 212 व परिवहन संवर्गातील वाहनामध्ये 525 ची वाढ झाली आहे.

वायुवेग पथकाने वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क) 1 कोटी 25 लाख असून वार्षिक पूर्तता 1 कोटी 30 लाख इतकी केली आहे. याचे प्रमाण 104 टक्के आहे गत वर्षीच्या तुलनेत 39.97 टक्के इतकी वाढ आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीमध्ये वार्षिक लक्षांक 2 कोटी इतका होता त्याची वार्षिक पूर्तता 100 टक्के करण्यात आली तर तडजोड शुल्क वार्षिक पूर्तता सुमारे 1 कोटी 94 इतकी होती तर बाहेरील राज्यातून येणाऱ्या वाहनावरील कर 1 कोटी 40 लाख असा एकूण 3 कोटी 35 लाख 9 हजार इतका जमा झाला असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!