वेर्ले, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे पंचक्रोशी वासीयांचे आयोजन
सावंतवाडी (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती कार्यक्रम वेर्ले, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे पंचक्रोशीतील सर्व परिवर्तनवादी अनुयायी व बौध्दजन तरुण मंडळ, समतानगर – वेर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २३ एप्रिल, २०२३ रोजी वेर्ले येथे साजरा होत आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी सकाळी ९.०० वा. ध्वजारोहण, सकाळी ९.३० वा. त्रिसरण, पंचशील, बुध्द पूजापाठ, सकाळी १०.०० वा. अल्पोपहार व चहा, स्वागताध्यक्ष कविता दत्तप्रसाद कदम, सकाळी ११.०० वा. जयभीम रॅली, दुपारी १.०० वा. स्नेहभोजन, दुपारी ३.०० वा. जाहीर सभा व सत्कार सोहळा, सभाध्यक्ष एकनाथ भिवा कदम, उद्घाटक ऍड. संदीप निंबाळकर, विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – चळवळ, दशा आणि दिशा, प्रमुख व्याख्याते प्रभाकर जाधव, विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – सामाजिक क्रांती, प्रमुख उपस्थिती बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीचे अध्यक्ष सुनील जाधव उपस्थित राहणार आहेत. तर रात्रौ ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वेर्ले, सांगेली, कलंबिस्त व शिरशिंगे पंचक्रोशी वासीयांमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ८२७५३३४९२६, ९७६७०८४६४३, ७०३८१६१३४५, ८२७५३७६५०९.