नगराध्यक्ष नलावडेंनी सत्ताधारी नगरसेवकांसह केले प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे स्वागत

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली चे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते. कातकर यांनी यापूर्वी कणकवलीत नायब तहसीलदार म्हणून काम केले असून, त्यावेळी पासून त्यांच्या कामाची कार्यपद्धती लोकाभिमुख राहिली आणि त्यामुळे येत्या काळात देखील ते लोकाभिमुख काम करतील असा विश्वास नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

error: Content is protected !!