वारवाडी मित्र मंडळ वारगाव मार्फत भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): वारगाव पवारवाडी मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही पवारवाडी विकास मंडळ, मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ, वारगाव आयोजित सत्यनारायण महापूजा दि. १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या निमित्ताने शुक्रवार दि. १२ मे, २०२३ रोजी श्री इसवटी चव्हाट्यासमोर, पवारवाडी, वारगाव येथे भव्य बॉक्स नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम पारितोषिक ९,९९९/- आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ६,६६६/- आकर्षक चषक व तृतीय पारितोषिक ३,३३३/- आकर्षक चषक सोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी आकर्षक चषक ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत पंच किंवा कमिटी जवळ गैरवर्तन केल्यास तो संघ बाद करण्यात येईल. प्रत्येक संघाने सामना सुरू होण्यापुर्वी ३० मिनिटे अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. प्रत्येक सामना ३ षटकांचा राहील. एका संघात ७ खेळाडू असतील. सामने रात्री ठिक ०८.०० वाजता सुरु होतील. सामन्यात / नियमात फेरबदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत. खेळाडूला गंभीर दुखापत झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत. उर्वरित नियम स्पर्धेच्या वेळी सांगितले जातील, असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रथम १६ संघांनाच प्राधान्य दिले जाईल. प्रवेश फी रु. १००० असून ती ८ मे पर्यंत जमा करायची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क विक्रांत सावंत : 9322538466, संकेत वळंजू : 8888239342, प्रशांत सावंत : 9819289140, निखिल वळंजू : 9730858888 या नंबरवर संपर्क साधावा.

error: Content is protected !!