खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद उर्दु शाळा बंदरवाडी खारेपाटण या शाळेचे मुख्याध्यापक श्री रुबाब रमजान फकीर सर यांचा नुकताच खारेपाटण केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांच्या वतीने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ तसेच खारेपाटण केंद्रातील शिक्षक श्री असिफ सय्यद सर,श्रीम छाया पडोळकर यांचा आंतर जिल्हा बदली निमित्त सदिच्छा कार्यक्रम खारेपाटण गावचे माजी उपसरपंच श्री इस्माईल मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण, बंदरवाडी उर्दू शाळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सद्गुरू कुबल,मुस्लिम जमात ए मोहला कमिटी खारेपाटण बंदरवाडी चे अध्यक्ष श्री परवेज पटेल, खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष पाटणकर,जि.प.उर्दू शाळा बंदरवाडी,खारेपाटण या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीम शबनम ठाकूर,खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण उर्दू शाळेचे शिक्षक श्री रुबाब फकीर सर यांनी १९९२ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या उर्दू भाषिक शिक्षकी पेशा नोकरीला सुरवात करून ३ तालुक्यातील एकूण ७ शाळांमध्ये आतापर्यंत काम केले असू सुमारे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते खारेपाटण बंदरगाव येथील जि.प.उर्दू शाळेतून वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त खारेपाटण केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ,पुष्पगच्छ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बंदरवाडी मुस्लिम मोहला कमिटीच्या वतीने सुधा त्यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण केंद्रातील रामेश्वर नगर जि.प. शाळेच्या शिक्षिका श्रीम.छाया पडोळकर व काझीवाडी जि.प.उर्दू शाळेचे शिक्षक श्री असिफ सय्यद सर यांची आंतर जिल्हा बदली झाल्याने त्यांच्या देखील खारेपाटण केंद्राच्या शिक्षकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक श्री रबाब फकीर सर यांनी सिंधुदुर्ग वासियानी नोकरीच्या काळात दिलेले भरभरून असे प्रेम आपण केलेले सहकार्य कधीच विसरणार नाही. असे भावपूर्ण उद् गार व्यक्त केले. उपस्थित विविध मान्यवरांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री तुपविरे सर यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार उर्दू शाळेचे शिक्षक श्री महमद सोलकर यांनी मानले.