कणकवली (प्रतिनिधी) : श्री इसवटी बामणदेव मंदिर बोर्डवे येथे प्रतिवर्षीप्रमाणे वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ४ ते ६ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ४ मे रोजी सकाळी ९ ते १० या कालावधीत श्री इसवटी बामणदेव अभिषेक व लघुरुद्र, सकाळी १० ते ११ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ हळदीकुंकू, सकाळी ४ ते ६ मुलांचे व महिलांचे फनी गेम्स आणि रात्रौ ८ वाजता जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं. १ या प्रशालेतील मुलींचा भक्तीचा महिमा हा पौराणिक दशावतार प्रयोग होणार आहे. शुक्रवार ५ मे रोजी सकाळी ९ ते १० श्री इसवटी बामणदेव अभिषेक व लघुरुद्र, सकाळी १० ते ११ आरती व तीर्थप्रसाद तर रात्रौ ९ वाजता महिलांसाठी खास होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) ही स्पर्धा होणार आहे. शनिवार ६ मे रोजी सकाळी ८ वाजता श्री इसवटी बामणदेव अभिषेक व लघुरुद्र, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा तर दुपारी १२ ते १ वाजता ओम श्री स्वामी समर्थ नवतरुणी प्रासादिक भजन मंडळ लोरे नं. १ च्या कु. रिया मेस्त्री यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रौ ९ वाजता श्री महापुरुष सेवा मंडळ आयोजित श्री दिर्बादेवी कलामंच वरवडे, सुतारवाडी प्रस्तुत ‘माझं काय चुकलं’ हे तीन अंकी सामाजिक नाटक होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा रसिकांनी आणि भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तेली बंधू व समस्त ग्रामस्थ बामणवाडी खुर्बेवाडी बोर्डवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.